महात्मा फुल्यांना बाबासाहेबांनी गुरु मानले होते. म. फुल्यांच्या वाङ्मयातून आणि चळवळीमधून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे बाबासाहेबांनी कृतातज्ञतेने नमूद केले आहे. डॉ. आंबेडकरसह अनेक महापुरुषांना ज्या वाङ्मयातून मार्गदर्शन मिळाले ते फुले वाङ्मय समाजक्रांतीची, व्यापक परिवर्तनाची, परिभाषा सांगणारे वाङ्मय आहे. हे साहित्य महाराष्ट्राला आणि भारतीय समाजजीवनाला समतेची दिशा देणारे साहित्य आहे.